Toys with Trash

एक आगळीवेगळी एकदिवसीय कार्यशाळा 

नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स प्रस्तुत करत आहेत

 मुलं आणि पालक दोघांसाठी एक आगळीवेगळी एकदिवसीय कार्यशाळा - 

आपल्या मुलांसोबत "वैज्ञानिक संकल्पना शिकविणारी खेळणी बनवण्याचा अनोखा अनुभव घ्या आणि सोबतच हसत खेळत विज्ञान शिका"

दैंनंदिन जीवनात आपल्या आसपास आढळणार्‍या साध्या सोप्या गोष्टी वापरुन विज्ञान शिकविण्यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या पद्मश्री डॉ. अरविंद गुप्ता यांच्या टीममधील
श्री. शिवाजी माने आपल्याला "विज्ञानातील गमतीजमतींचा पेटारा" उघडून दाखवणार आहेत.

" मी जेव्हा ऐकतो, तेव्हा मी ते विसरुन जातो. मी जेव्हा पाहतो, तेव्हा ते माझ्या लक्षात राहते.
मी जेव्हा स्वतः करुन पाहतो, तेव्हा ते मला समजते !"

या कार्यक्रमात का सहभागी व्हावे ?

1)केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा वेगवेगळे प्रयोग खेळण्यांच्या स्वरुपात करण्याचा आनंद मिळविण्यासाठी


2} मुलांमध्ये विषयाची रुची निर्माण करुन स्वयंअध्ययनाकडे वळविण्यासाठी


3)स्क्रीनवर बघण्यापेक्षा स्वतः करुन पाहण्याचा आनंद मिळविण्यासाठी



4)मुलांसोबत मुलं होऊन शिकण्याचा आनंद मिळविण्यासाठी


5) महागड्या खेळण्यांपेक्षा , सहज उपलब्ध होणार्‍या वस्तूंपासून निर्माण होणार्‍या एका वेगळ्याच विश्वात रममाण होण्याचा आनंद मिळविण्यासाठी


6) कसं शिकावं आणि कसं शिकवावं हे अनुभवण्यासाठी


ही कार्यशाळा कोणासाठी ?

1. इयत्ता चौथी ते दहावी पर्यंत शिकणारे विद्यार्थी (१० ते १६ वर्षे , कोणत्याही माध्यमातील)
2. पालक
3. विज्ञान शिकण्यात आणि शिकविण्यात रस असणार्‍या सर्वांसाठी 

कार्यशाळेची वेळ व ठिकाण -

१२ मे २०१९, सकाळी १० ते ५
मुलुंड पश्चिम, मुंबई (पुर्ण पत्ता रजिस्ट्रेशन नंतर देण्यात येईल)

कार्यशाळेविषयी 

कार्यशाळेची फी - 

एका व्यक्तीसाठी -
रु १७५०/- प्रति व्यक्ती
दोन व्यक्तींसाठी -
रु. १४५०/- प्रति व्यक्ती
(दोन मुलं किंवा एक पालक - एक मुल)  

फी मध्ये या गोष्टींचा समावेश असेल - 

१. खेळणी बनवण्यासाठीचे किट
२. चहा, नाश्ता व दुपारचे जेवण
३. प्रमाणपत्र 

त्वरा करा ! मर्यादित जागा उपलब्ध !

अधिक माहिती

अधिक माहिती आणि रजिस्ट्रेशनसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा किंवा इमेल करा.
काही प्रश्न असल्यास सोबत दिलेला फॉर्म भरून पाठवा.

phone

+91-973-049-6531

email

admin@netbhet.com